बँक खातेधारकास सायबर सेलने शोधून काढले.

0
144

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ती रक्कम राजस्थान मधील मोहम्मद जुबेर जावेद चव्हाण याला पाठवली असल्याचे सांगितले.

त्यामुळे सायबर सेलने मोहम्मद जुबेर जावेद चव्हाण याचा शोध सुरू केला. त्यानुसार सायबर सेलच्या एका पथकाला राजस्थान येथे पाठवण्यात आले. या पथकाने तीन दिवसात तब्बल तीन हजार किलोमीटरचा प्रवास करत आरोपीला अटक केली. हा आरोपी दुबई येथील सायबर गुन्हेगारांना भारतातील नागरिकांच्या फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी बँक खाते उपलब्ध करून देत होता.

नागरिकांची ऑनलाइन माध्यमातून फसवणूक झाली असल्यास त्यांनी भारत सरकारच्या राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (www.cybercrime.gov.in) वर अथवा 1930 या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन देखील पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी केले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, पोलीस अंमलदार लोखंडे, कारके यांच्या पथकाने केली.