बँकेने सील केलेल्या सदनिकेत घुसखोरी

0
126

सांगवी,दि. 16 ऑगस्ट (पीसीबी)
बँकेने सील केलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून आत घुसखोरी केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे 5 जुलै रोजी घडली.

संभाजी निवृत्ती कातुर्डे (वय 46, रा. आंबेगाव पठार, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुणाल रमेश बोरवंडे (रा. शिवसाई अपार्टमेंट, पिंपळे सौदागर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसाई अपार्टमेंटमधील सदनिका जनता सहकारी बँक यांनी कायदेशीर कारवाई करीत सील केली होती. मात्र 5 जुलै 2024 रोजी आरोपीने सदनिकेचे सील व कुलूप तोडून घुसखोरी केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.