बँकेने सील केलेल्या सदनिकेत अतिक्रमण

0
93

चिखली, १७ जुलै (पीसीबी) – बँकेने सील केलेल्या सदनिकेचे सीलबंद कुलूप तोडून अतिक्रमण केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 12 जुलै रोजी सायंकाळी सुदर्शननगर, चिखली येथे घडला.सुनील विठ्ठल देसाई असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शिव,म गजानन बोरकर (वय 30, रा. धायरी, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई यांनी टी जे एस बी सहकारी बँक लिमिटेड या बँकेच्या संभाजीनगर, निगडी शाखेतून कॅश क्रेडीट कर्ज घेतले होते. थकबाकीसह 46 लाख 49 हजार 493 रुपये कर्ज देसाई यांनी फेडले नाही. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार देसाई यांची मालमत्ता (सदनिका) नायब तहसीलदार यांच्या मार्फत बँकेने सील केली. त्यानंतर देसाई यांनी सदनिकेचे सीलबंद कुलूप तोडले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.