बँकेने सील केलेल्या सदनिकेवर बेकायदेशीर ताबा; चौघांवर गुन्हा दाखल

0
200

दिघी, दि. १९ (पीसीबी) – कर्जाचे हप्ते थकवल्याने बँकेने सदनिका सील केली. सील केलेल्या सदनिकेवर बेकायदेशीरपणे ताबा घेऊन गृह अतिक्रमण केले. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी चोविसावाडी येथे घडली.

विजय सुदाम रसाळ, ज्ञानेश्वर सुदाम रसाळ आणि दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बसवराज लक्ष्मण नागनुरी (वय 36) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि पती विजय रसाळ यांनी आयसीआयसीआय बँकेकडून गृह कर्ज घेतले आहे. त्याची मुदतीत परतफेड न करता आरोपींनी कर्ज थकवले. त्यामुळे बँकेने सदनिका सील केली. आरोपींनी सदनिकेचे सील तोडून आत प्रवेश करून ताबा घेतला. हा प्रकार बँकेच्या निदर्शनास येताच बँकेने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.