बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न

0
4

दि.१३(पीसीबी)- पिंपरी येथील आयसीआयसीआय बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २० मार्च रोजी आयसीआयसीआय बँक ऑटोक्लस्टर, एम्पायर स्केअर, पिंपरी येथे घडली असून याप्रकरणी १२ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात आयसीआयसीआय बँकेतील डेप्युटी मॅनेजरने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद मेडिको दुकानातील भास्कर सखाराम खोपकर यांनी होलसेल मेडिकलचे दुकानदार आनंद सुरेश गांधी यांच्याकडून ८० हजार १०० रुपये रोख रक्कम बँकेत जमा करण्यासाठी आणले होते. बँकेतील कॅशिअर प्रवीण विवेक क्षीरसागर यांनी ग्लोरीकॅश सोर्टिंग मशीनमध्ये या नोटा तपासल्या असता २०० रुपयांच्या ९ नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले. याबाबत आनंद गांधी यांना विचारणा केली असता, त्यांचे अंदाजे ९० ते १०० रिटेलर दुकानदार असल्याने या बनावट नोटा कोणी दिल्या याबाबत त्यांना माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.