भोसरी, दि. १ (पीसीबी) – बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवून अनोळखी व्यक्तीने क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड मिळाले असल्याचे सांगून 34 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना एक सप्टेंबर रोजी भोसरी परिसरात घडली. या प्रकरणी 30 सप्टेंबर रोजी 7027326569 या क्रमांकावरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोन केला. फोनवरील व्यक्ती एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे त्याने सांगितले. त्यावरून फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड प्राप्त झाले असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. तसेच फिर्यादी यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर करण्यास भाग पाडून फिर्यादींच्या क्रेडिट कार्ड मधून 34 हजार 680 रुपये रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करत त्यांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.










































