बँकेतून बोलत असल्याचे सांगत दीड लाखांचा गंडा

0
263

किवळे, दि. १७ (पीसीबी) – बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून एका व्यक्तीला ओटीपी वेबसाईटवर टाकायला सांगत एक लाख ४८ हजारांची फसवणूक केली. ही घटना ३ जून रोजी सायंकाळी किवळे येथे घडली. निलेश गोरख काळे (वय ३२, रा. किवळे, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका महिलेने फोन केला. फोनवरील महिलेने ती एक्सीस बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांना एका वेबसाईटवर ओटीपी नंबर टाकण्यास सांगून त्यांच्या बँक खात्यातून एक लाख ४८ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.