बँकेच्या मूल्यांकन कर्त्याने स्वीकारले 42 लाखांचे खोटे सोने

0
177

सोने तारण ठेवणाऱ्या 12 जणांसह मूल्यांकन कर्त्यावर गुन्हा दाखल

दि २६ मे (पीसीबी ) – बँकेत मूल्यांकन कर्ता म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने 12 ग्राहकांकडून 41 लाख 99 हजार रुपये किमतीचे खोटे सोने तारण म्हणून ठेऊन घेतले. याप्रकरणी सोने गहाण ठेवणाऱ्या 12 ग्राहकांसह मूल्यांकन कर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 मार्च 2023 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीत दि बारामती सहकारी ली. बँकेच्या सांगवी शाखेत घडला.

दि बारामती सहकारी बँकेचे व्यवस्थापक विजय कदम यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 25) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश शरद जगताप (रा. हडपसर), प्रशांत शरद हेगडे (रा. नवी सांगवी), महेश सुदाम धुमाळ (रा. पिंपळे गुरव), गणेश किसन कोंगाळे (रा. सांगवी), निखील राहुल म्हेत्रे (रा. नवी सांगवी), गणेश शरद बागडे, प्रांजल विजय जोशी (रा. नवी सांगवी), प्रसाद चंद्रकांत डहाळे (रा. नवी सांगवी), विठ्ठल बाबुराव राऊत, तीन महिला, मुल्यांकन कर्ता दीपक विठ्ठल शहाणे (वय 51, रा. नवी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक शहाणे यांच्यावर दि बारामती सहकारी बँकेच्या सोने तारण विभागाची मुल्यांकन कर्ता म्हणून महत्वाची जबाबदारी होती. त्यांनी अन्य 12 लोकांशी संगनमत करून त्यांच्याकडून खोटे सोने बँकेत तारण ठेऊन घेतले. त्याबाबत खोटी कागदपत्रे बनवून बँकेकडून त्यांना 41 लाख 99 हजार रुपयांचे सोने तारण कर्ज देत बँकेची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.