पिंपरी, दि. १० (पीसीबी) – बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून महिलेकडून ओटीपी घेऊन 54 हजार रुपये ट्रान्सफर करत फसवणूक केली. ही घटना 3 जून रोजी संत तुकाराम नगर पिंपरी येथे घडली.प्रियांका अलख्य पॉल (वय 61, रा. मोरवाडी पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो बँक ऑफ इंडिया या बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे फिर्यादिस सांगितले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्याशी संबंधित ओटीपी घेऊन आरोपीने तीन टप्प्यात 54 हजार 273 रुपये काढून फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.