फ्लॅटच्या उघड्या दरवाजा वाटे आयफोन व लॅपटॉप चोरीला

0
419

निगडी, दि. २४ (पीसीबी) – फ्लॅटच्या उघड्या दरवाजे वाटे आयफोन व एक लॅपटॉप चोरीला गेला आहे ही घटना यमुना नगर निगडी येथे बुधवारी(दि.23) घडली.

याप्रकरणी शुभम सुभाष खैरे (वय 26 रा निगडी) यांनी बुधवारी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या रूमचा दरवाजा उघडा राहिला होता . यावेळी चोराने रूममधून पंधरा हजार रुपयांचा आयफोन व 25 हजार रुपयांचा लॅपटॉप तसेच बागेतील आधार कार्ड पॅन कार्ड बँक ऑफ इंडियाचे एटीएम व इतर काही कागदपत्रे चोरून नेली आहेत. याप्रकरणी निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.