फ्लॅटचा बेकायदेशीररित्या ताबा घेवून जिवे मारण्याची धमकी

0
112

पिंपरी, दि. 16 (प्रतिनिधी)

फ्लॅटचा बेकायदेशीररित्या ताबा घेवून तरुणाला शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिखली येथे घडला.

याप्रकरणी अजित बाबासाहेब सोनवणे (रा. राजे शिवाजीनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल गणपत गुंजाळ, सुनीता अनिल गुंजाळ, मयूर

अनिल गुंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी यांनी चिखलीतील शिवगंगा पार्क सेक्टर येथे कॅनरा बँकेकडून लिलावाद्वारे फ्लॅट विकत घेतला असून त्यावर फिर्यादी यांचा कायदेशीर ताबा आहे. तारिही आरोपींनी

बेकायदेशीरपणे फिर्यादी यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून त्या फ्लॅटचा ताबा घेतला. फिर्यादीला शिवीगाळ व धक्काबुक्की करून तेथून हाकलून दिले. ‘ तू परत येथे आला तर तुला जिवे मारून टाकतो, तुझ्यावर खोटी केस करतो’, अशी

धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी हे बर्‍याचदा त्यांना फ्लॅट खाली करण्यास सांगण्यास गेले असता आरोपीने तो फ्लॅट माझाच आहे, मी खाली करणार नाही, तुला काय करायचे ते कर, असे म्हणत धमकी दिली.