फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपने सादर केला बहारदार ‘हिंदी-मराठी प्रेम युगल’ गितांचा कार्यक्रम

0
344

फ्रेंड्स म्युझिकल ग्रुप, चिंचवडच्या कलाकारांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ चे औचित्य साधून, सादर केला बहारदार ‘हिंदी-मराठी प्रेम युगल गितांचा कार्यक्रम मैने प्यार किया

संस्थेचे संस्थापक श्री. महेश व सौ. जयकांता शेटे यांच्या संकल्पनेतून, ग. दि. माडगूळकर सभागृह, आकुर्डी-निगडी, येथे हा कार्यक्रम रविवार दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात कभी कभी मेरे दिल  मे, तू मिले दिल खिले, आके तेरी बाहो मे, पेहला नशा पेहला खुमार, राजा ललकारी, चोरीचा मामला अशा विविध गाण्यांच्या सादरीकरणाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 खास पाहुण्या कलाकार, सुप्रसिद्ध गायिका, ‘व्हॉईस ऑफ लता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. मनीषा निश्चल यांना पाचारण करण्यात आले.

तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर पिं. चिं. शहर चे मा. श्री. राजूजी मिसाळ यांनी सरस्वती व गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरवात केली. कार्यक्रमाचे प्रायोजक वेदस्पर्श आयुर्वेदिक क्लिनिकच्या आयुर्वेदाचार्य डॉ. सौ. गीतांजली क्षीरसागर, ‘इंजिनिर्स पाणीपुरीवाला’, पिं. चिं. शाखेच्या प्रोप्रायटर सौ. स्नेहा बागणे, ‘सकयलार्क म्युझिक अकॅडेमी चे संस्थापक श्री. रत्नाकर वारवाडेकर, म. न. से. च्या कार्यकर्त्या सौ. विद्या कुलकर्णी, ‘मैफल’, संभाजीनगर चे संस्थापक श्री. गणेश देशपांडे यांनी दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमात माजी प्राचार्य, कुलगुरू डॉ. श्री. प्रदीप जबदे, संभाजीनगर, सौ. अश्विनी देशपांडे, इरिगेशन डिपार्टमेंट, संभाजीनगर, श्री. आशिष मालगावकर, श्री. जयेश गोयल, श्री. गणेश खुडे, बारामती, श्री. आनंद टोलीवाल, श्री. गौरव श्रीवास्तव, श्री. विश्वकर्मा चव्हाण, श्री. राजेश कुमार, सौ. सुप्रिया जाधव, सौ. शुभांगी पवार, सौ. ध्यानवि शुक्ल, राजकोट, गुजरात अशा विविध ठिकाणच्या व विविध क्षेत्रातील कलाकारांनी आपले उत्तम गायन सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या सह कु. वेरॉनिका हिने नवीन जुन्या गाण्यांचे मॅशप सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अखिल राजपूत, पी. एस. आय., पुणे यांनी केले. तसेच ऍड. सौ. शोभा कदम, गरवारे टेक्निकल फायबर्स ली. चिंचवड चे विविध पदाधिकारी, शहरातील अशा नामवंत मान्यवरांनी कार्यक्रमात हजेरी लावून शोभा वाढवली. आणि ज्यांच्याशिवाय कार्यक्रम अशक्य होता असे वादक कलाकार श्री. चिंतन मोढा, श्री. अमन सय्यद, श्री. आयुष शेखर, श्री. असिफखान इनामदार, श्री. हर्षद गणबोटे, श्री. हार्दिक रावल यांनी अतिशय सुंदर साथ दिली.