फ्रिजचे करंट लागून बालकामगाराचा मृत्यू , मालकावर गुन्हा दाखल

0
239

तळवडे, दि. १२ (पीसीबी) – फ्रिज ला करंट लागत असल्याचे माहिती असून देखील एका 17 वर्षीय बाल कामगाराला फ्रिजवर चढून काम सांगितले. या दरम्यान मुलाचा करंट लागून मृत्यू झाला आहे.ही घटना सोमवारी (दि.11) तळवडे येथील येवले चहा येथे घडली आहे.

यावरून तळेवडे येथील येवले चहा चालक गणेश जगताप याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणी प्रेमकुमार सिद्धराम बनसोडे (वय 43 रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वय 17 आहे हे माहिती असून देखील आरोपीने त्याला कामावर ठेवले. तसेच दुकानातील फिजच्या बॉडीमध्ये करंट उतरत असल्याचे ही आरोपीला माहिती होते. याबबत कामगारांच्या सुरक्षितते बाबत आरोपीने कोणतीही उपाययोजना केली नाही. उलट फिर्यादीच्या मुलाला सोमवारी फ्रिजवर चढून चहाचे कप काढण्यास सांगितले. यामुळे फिर्यादीच्या मुलाला जोरदार करंट लागले. त्यात फिर्यादीच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यावरून अल्पवयीन मुलाला बेकायदेशीररित्या कामावर ठेवणे तसेच कामगारांच्या सुरक्षिततेची काळझी घेतली नाही म्हणून आरोपीवर बालकामगार सुधारीत अधिनियम अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.,