फोम बनविण्याच्या कंपनीला आग

0
224

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी येथे फोम बनविण्याच्या कंपनीला भीषण आग लागली. ही घटना आज (मंगळवारी, दि. 19) सकाळी घडली. सुदैवाने या आगीमध्ये कोणीही जखमी झाले नाही.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वाअकरा वाजता पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या मुख्य विभागास फोनवरून माहिती मिळाली की, पिंपरी मधील वायसीएम रुग्णालयाच्या मागील बाजूला आग लागली आहे. धुराचे लोट लांबून दिसत असल्याने अग्निशमन विभागाने वल्लभनगर मुख्य केंद्राचे दोन, चिखली आणि भोसरी उपकेंद्राचे प्रत्येकी एक असे चार बंब घटनास्थळी रवाना केले. चार बंब आणि इतर पाच ते सहा टँकरच्या मदतीने सुमारे दीड तासात आग विझविण्यात आली.

चिंतामणी ट्रेडिंग कार्पोरेशन या कंपनीत फोम बनवला जातो. कंपनीतील फोमच्या गठ्ठ्यांना अचानक आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. कोणीही या घटनेत जखमी झाले नसून नुकसानीबाबत पंचनाम्याची कार्यवाही मंगळवारी उशिरापर्यंत सुरु होती.