फोन रेकॉर्ड लग्नात प्रसारित करण्याची धमकी देत मागितली खंडणी

0
213

वाकड, दि. ७ (पीसीबी) – महिलेच्या मोबाईल मधील डेटा आणि कॉल्सचे डिटेल रेकॉर्ड आपल्याकडे असल्याची धमकी देत एका व्यक्तीने महिलेला फोन करून खंडणी मागितली. ही घटना २ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत घडली.

याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने अनोळखी व्यक्ती विरोधात सोमवारी (दि. ६) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने त्याच्याकडे फिर्यादीच्या मोबाईलचा सर्व डेटा आणि कॉल्सचे डिटेल रेकॉर्ड आपल्याकडे असल्याची धमकी दिली. हा डेटा महिलेच्या पतीकडे पाठवून आणि नात्यातील एका लग्नात स्क्रीनवर दाखवून बदनामी करण्याची आरोपीने धमकी दिली. त्याबदल्यात महिलेकडे प्रथम ५० हजार रुपये आणि त्यांनंतर एक लाख रुपये खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.