फोन उचलला नाही म्हणून कथीत भाईने केले तरुणावर कोयत्याने वार

0
368

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) -तुला कॉल केले तरी तू कॉल उचलले नाही म्हणत दोघांनी तरुणावर कोयत्याने जिवघेणे वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून हा सारा प्रकार मंगळवारी (दि.16) रात्री पिंपरीतील तुकाराम नगर येथे घडला आहे.

याप्रकरणी अजिंक्य अरुण टाकळकर (वय 21 रा.मोशी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.18) फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी आशिष रामबाबू पाल (रा. पिंपरी गाव), सागर ज्ञानदेव ढावरे (वय 20 रा. पिंपरी) अशी अटक आरोपीची नावे असून त्यांच्या सोबतच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे यात्रेवरून घरी दुचाकीवरून जात असताना दत्त मंदिराजवळ फिर्यादीला आडवून बोलके कुछ होता नही म्हणत कोयत्याने वार केला. तो फिर्यादीने चुकवला असता सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. का मारताय विचारले असता आरोपी आशिष म्हणाला की, मी कोयता भाई आहे, तुला कॉल केले तरी तू कॉल उचलत नाही म्हणून आत्ता तुलाी जिवंत सोडत नाही म्हणत आरोपीने पुन्हा फिर्यादीवर वार करत जखमी केले. फिर्यादी जिव वाचविण्यासाठी जवळच्या घरात लपले असता आरोपींनी तेथे जात आरडा-ओरड करत दहशत माजवली. यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.