फोनवर बोलत जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकावणाऱ्यास अटक

0
434

देहूगाव, दि. ९ (पीसीबी) – फोनवर बोलत पायी जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकावणाऱ्याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे ही घटना गुरुवारी (दि.5) दुपारी देहूगाव येथे घडली.

याप्रकरणी पोलिसांनी दिगंबर सुनील साळुंख( वय 19 रा चिखली) याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात शुभम बाबा देव वने (वय 21 रा देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या फोनवरून बोलत पायी घरी जात होते. यावेळी आरोपी पाठीमागून आला व त्याने फिर्यादींचा बोलत असलेला 12 हजार रुपयांचा फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपीचा शोध लावत त्याला अटक केली आहे. याचा पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.