फोटो मॉर्फ करून कॉलेज मधील मित्र-मैत्रिणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत तरुणीचा विनयभंग

0
155

दि ७ जुलै (पीसीबी ) वाकड,
तरुणीचे आणि तिच्या कुटुंबियांचे फोटो मॉर्फ करून ते फोटो सोशल मिडियावरील अकाउंटवर ठेवत तरुणीच्या मित्र-मैत्रिणींना बनावट खात्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तरुणीचा विनयभंग केला. हा प्रकार जानेवारी ते 24 जून 2024 या कालावधीत वाकड परिसरात घडला.

याप्रकरणी पिडीत तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी तरुणीच्या नावाचे बनावट सोशल मिडीयावर अकाउंट बनवले. त्यावर फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांचे फोटो मॉर्फ करून ठेवले. त्या बनावट खात्यावरून फिर्यादीच्या कॉलेज मधील मित्र-मैत्रिणींना आणि ओळखीच्या मुलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. यामुळे फिर्यादीचा विनयभंग झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.