फोटो डिलीट केला नाही या कारणावरून तरुण सह त्याच्या दोघांना बेदम मारहाण

0
141
crime

हिंजवडी, दि.५ (पीसीबी)

घरासमोर लघुशंका करताना काढलेला फोटो डिलीट केला नाही या कारणावरून तरुण त्याचा मित्र व वडिलांना लोखंडे रोड नि मारहाण करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि.4) रात्री कोकाटे वस्ती बावधन येथे घडली.

याप्रकरणी पोलिसांनी शमशाद शफीउल्ला अहमद (वय 28 रा बावधन), बजरंगी भीम यादव (वय 32 रा. बावधन), गणेश सुरेंद्र कश्यप (वय 29) व विजय रामनारायण पालवे (वय 52) या चौघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आदित्य चंद्रकांत जाधव (वय 22 रा. बावधन) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादींच्या घरासमोर लघुशंका करत होते. यावेळी फिर्यादी आणि त्यांचा फोटो काढला. आरोपींनी त्यास डिलीट करायला सांगितला मात्र फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. या रागातून आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली. यावेळी त्यांचे मित्र व वडील हे भांडण सोडवण्यासाठी आले असता तिघांनाही आरोपींनी लोखंडी रोड व लोखंडी अँगल यांनी मारहाण केली. यात फिर्यादी व इतर दोघे गंभीर जखमी झाले. आरोपींनी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. यावरून हिंजवडी पोलिसांनी चौघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.