फोटो, चॅटिंग पतीला दाखवण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार

0
317

दिघी, दि. १० (पीसीबी) – विवाहितेचे फोटो आणि चॅटिंग पतीला दाखवण्याची धमकी देत एकाने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना 3 फेब्रुवारी ते 24 जून या कालावधीत डुडुळगाव आणि मोशी येथे घडली.
याप्रकरणी पीडित विवाहितेने शुक्रवारी (दि. 8) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश केरनाथ बदे (वय 23, रा. मोशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झालेल्या महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना ठार मारण्याची आरोपीने धमकी दिली. तसेच फिर्यादी आणि आरोपीने इंस्टाग्राम वरील चॅटिंग तसेच आरोपी आणि फिर्यादी यांचे सोबतचे फोटो फिर्यादी यांच्या पतीला दाखवण्याची आरोपीने धमकी दिली. ब्लॅकमेल करून आरोपीने फिर्यादीवर वारंवार बलात्कार केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.