फॉर्च्यूनरची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
93

चाकण, दि. 11 (पीसीबी) : भरधाव वेगात जाणाऱ्या फॉर्च्यूनर कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 9) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आळंदी फाटा ते आळंदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला.

दादा उत्तम चखाले (वय 30) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गंगाराम लक्ष्मण शिंदे (वय 39, रा. आळंदी देवाची) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गंगाराम शिंदे हा त्याच्या ताब्यातील फॉर्च्युनर गाडी भरधाव वेगात चालवत होता. आळंदी फाटा ते आळंदी या रस्त्यावर फॉर्च्युनर कारने दादा चखाले यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दादा चखाले यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.