फेसबुक वापरकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ , फॉलोअर्स अचानक घटले

0
167

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी): आजच्या युगात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फेसबुक हे अनेक लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोक फेसबुक हाताळत असतात. जगभरातील फेसबुक वापरकर्त्यांचे फॉलोअर्स अचानक घटलेत. अनेकांचे लाखो फॉलोअर्स घटून ते दहा हजारांच्या आत आलेत. या सर्वांचे फॉलोअर्स गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यात खुद्द मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गला याचा फटका बसलाय. त्याचे फॉलोअर्सही दहा हजारांच्या आत आलेत. त्यामुळे जगभरात फेसबुक वापरकर्त्यांमध्ये गोंधळ उडालाय. याच्या फेसबुककडे तक्रारी केल्या जात आहेत.

फेसबुक अनेकदा फेकअकाउंट बंद करते. त्यामुळे फेसबुक वापरकर्त्यांचे फॉलोअर्स कमी होत असतात. परंतु आज मात्र जगभरातील अनेकांचे फॉलोअर्स एका झटक्यात हजारो, लाखोंनी कमी झाले आहेत. मार्क झुकरबर्गचे फॉलोअर्स हे चार कोटींवरून ते १० हजारांवर आलेत. अनेकांचे फॉलोअर्स घटून ९ हजार ९९३ इतके झाले आहेत. फेसबुकमध्ये असलेल्या बगचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे, असे अनेकदा घडले आहे. परंतु आता अचानक जास्त फॉलोअर्स घटले आहे. याबाबत मेटाकडून काहीही प्रतिक्रिया आतापर्यंत आलेली नाही.

प्रोफाइल सर्च केल्यानंतर फॉलोअर्स पूर्ण दिसत आहे. परंतु प्रोफाइल ओपन केल्यानंतर ते कमी दिसत आहेत. लाखो फॉलोअर्स असलेल्यांची फॉलोअर्सची संख्या आता ९ हजार ९९३ इतके दिसत आहे. त्यात झुकरबर्गचे फॉलोअर्सही ९ हजार ९९३ इतके झालेत. बनावट (फेक) फॉलोअर्स हटविण्यात आल्याने असे होत असल्याचे चर्चा आहे. पण झुकरबर्ग यांचे फॉलोअर्स ही फेक आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नेमकी फेसबुकमध्ये बग आला आहे का, दुसरी काही कारण आहे हे मेटाकडून जाहीर केल्यानंतर स्पष्ट होईल. परंतु फॉलोअर्स घटल्यामुळे फेसबुक वापरकर्त्यांमध्ये खळबळ मात्र उडाली आहे.