फेरीवाला समितीवर आमचे ८ उमेदवार निवडून द्या : बाबा कांबळे

0
90

फेरीवाला निवडणुकीच्या निमित्ताने संघटनेचा जाहीरनामा प्रसिद्ध

– संघटनेशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा : बाबा कांबळे

पिंपरी, दि. 11 (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये शहर फेरीवाला समितीसाठी आठ सदस्य निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये शहरातील नोंदणीकृत फेरीवाले यांना प्रत्येकी आठ मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या अधिकाराचा वापर करून संघटनेचे ८ उमेदवार बहुमताने निवडून द्या, असे आवाहन टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील फेरीवाल्यांना केले. तसेच संघटनेशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा, असेही बाबा कांबळे म्हणाले.

निवडणुकीच्या निमित्ताने संघटनेने जाहीरनामा प्रसिद्ध केला. या वेळी बाबा कांबळे बोलत होतो. पिंपरी चिंचवड शहरातील टपरी, पथारी, हातगाडी धारकांचे प्रश्न सोडण्यासाठी महत्त्वाचे प्रश्न घेऊन काम करू. आधुनिक पद्धतीने हॅकर्स झोन निर्माण झाले पाहिजे, सामाजिक सुरक्षा योजना, म्हातारपणी पेन्शन अतिक्रमण कारवाईमुक्त फेरीवाले विविध प्रश्नांचे आश्वासन देत जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला,1) बळीराम भगवानराव काकडे,( सर्वसाधारण गट)2) दामोदर विठोबा मांजरे,( सर्वसाधारण गट)3) अशा बाबासाहेब कांबळे, (सर्वसाधारण महिला गट) 4) रमेश साधू शिंदे, (अनुसूचित जाती गट)5) शुभांगी रवींद्र मोरे, (अनुसूचित जमाती गट)6) ममता अमित मानूरकर, इ(तर मागासवर्ग गट)7) कलीम सल्लाउद्दीन शेख, (अल्पसंख्याक गट)8) वासंती मदन जाधव, (विकलांग गट) या उमेदवारांनी संघटनेने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

यावेळी, प्रदेश सचिव प्रकाश यशवंते, पंचायत कार्याध्यक्ष इस्माईल बागवान, उपाध्यक्ष अनिल गाडे, सरचिटणीस मधुरा डांगे, शहर सचिव शिवाजी कुडूक, महिला अध्यक्षा सरोजा कुचेकर, उपाध्यक्ष नाणी गजरमल, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना गाडगे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शेलार, उपाध्यक्ष रवींद्र लंके, प्रवक्ते अविनाश जोगदंड, आदी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले की, मी गेल्या १५ वर्षापासून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहर फेरीवाला समितीवर सदस्य आहे. पूर्वी आपली एकच संघटना होती आपल्या संघटनेच्या लेटरवर आपण नाव देत होतो. ते नाव शहर फेरीवाला समितीवर घेतले जात होते. परंतु आता अनेक संघटना निर्माण झाल्या. यामुळे या निवडणुका लागल्या आहेत. ज्यांना मी गेली दहा वर्षे फेरीवाला समितीवर सदस्य म्हणून संधी दिली. माझ्या सहीने यांचे नाव नियुक्त झाले. असे आपल्यातले काही गद्दार स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय पक्षात जाऊन संघटना स्थापन करून आता या फेरीवाला समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या विरोधामध्ये पॅनल करून उभे आहेत.जे संघटनेचे होऊ शकले नाहीत ते फेरीवाल्यांचे काय होणार. अशा गद्दारांना धडा शिकवा, असे आवाहनही बाबा कांबळे यांनी केले. आपले पॅनेल निवडून आल्यास टपरी, पथारी, हातगाडी धारकांचे प्रश्न सोडवू, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 2005 पासून आपण काम करत असून 2007 साले देशातला पहिला कायदा आपण मंजूर करून घेतला. देशामध्ये कुठेही कायदा नव्हता यावेळी आपण हा कायदा मंजूर करून घेतला. ज्या संघटनेने कायदा मंजूर केला लायसन्स मिळून दिले फेरीवाल्यांना मताचा अधिकार मिळवून दिला त्या संघटनेंना मतदान करा अशा आव्हान देखील यावेळी बाबा कांबळे यांनी केले.