फेक इन्स्टाग्राम अकाऊंटवरून महिलेची बदनामी करत पैशांची मागणी करणाऱ्यावर गुन्हा

0
231

भोसरी, दि. ०८ (पीसीबी)- फेक इन्स्टाग्राम अकाउंवरून महिलेची बदनामी करत पैशांची मागणी करणाऱ्या आरोपी विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 एप्रिल पासून सुरु होता.

याप्रकऱणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दिपक लक्ष्मण ठाकूर (रा. धुळे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ओळखीचा आरोपी याने kal_yani211101या इन्स्टाग्रामवरून फिर्यादी सोबत नकळत काढलेले फोटो पोस्ट करून ते फिर्यादीच्या पती, मित्र व नातवाईकांना शेअर करण्याची धमकी दिली. तसेच ई सेवा केंद्रात झालेली नुकसान भरपाई म्हणून 70 हजार रुपये दे नाही तर फोटो व्हारल करेन अशी धमकी दिली यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.