फॅशन डिझायनिंग कक्ष उदघाटन

0
277

निगडी, दि. ०६ (पीसीबी) – फॅशन डिझाइनिंग कक्ष उद्घाटन समारंभ झाला. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे सौ. अलकाताई करकरे-(इंनप्रो संस्थापिका) उपस्थित होत्या. त्याचबरोबर इनर व्हील क्लब निगडी अध्यक्ष व सौ. डॉ. रंजनाताई कदम त्यांच्यासोबत त्यांच्या क्लब मधील इतर सदस्य सौ.कल्याणी ताई, सोनालीताई, सुजाताताई ढमाले, सविताताई, स्मिताताई, जयश्रीताई, माधुरीताई, वैशालीताई, आरती ताई या उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी प्रबोधनीच्या माजी विद्यार्थिनी ॲड. सौ. प्रतिभाताई दलाल आल्या होत्या. ग्राम प्रबोधिनीचे कार्यवाह मा. श्री भताने सर उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते स.11.30 वाजता उदघाटन व मशीनचे पूजन करण्यात आले.या कक्षाविषयी अभ्यासक्रम व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी विषयी माहिती श्री.गणेश भताने सरांनी सर्व पाहुण्यांना करून दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक व प्राचार्य मा. लासुरकर सर यांनी केले. आलेल्या प्रमुख पाहुणे याचा परिचय मनीषा ताई नी करून दिला. आलेल्या पाहुण्यांना कृतज्ञता म्हणून इ. 11 वी तील मुलींनी फॅशन डिझाईन प्रशिक्षणात बनवलेल्या पर्स व नारळ ,शाल हसत, खेळत योग पुस्तक भेट देण्यात आले. आलेल्या पाहुण्यांपैकी अलकाताई यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कामाविषयी व त्या कंपनीच्या सर्वोच्च स्थानापर्यंत कशा पोहोचल्या याविषयी मार्गदर्शन केले तसेच पुढील भविष्यातील संधी विषयी सांगितले. रंजनाताई व सौ प्रतिभाताई कौशल्य विषयी मार्गदर्शन करून स्वावलंबी व्हा त्यासाठी सदैव मार्गदर्शन करु असे त्यांनी सांगितले. संस्थेचे कार्यवाह मा. भताने सरांनी विद्यालयामध्ये फॅशन डिझायनिंग कक्ष सुरू करण्यापाठीमागचा उद्देश व भविष्यामध्ये त्याचा विद्यार्थिनींना होणारा फायदा याविषयी सांगितले त्याचबरोबर कौशल्या ची भविष्यामध्ये असणारी गरज व स्वावलंबी व आत्मनिर्भर बनण्यासाठी याचा फायदा होणार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी प्रोत्साहन दिले. कार्यक्रमात सूत्रसंचालन व आभार मुंढे सरांनी केले. एकूणच हा कार्यक्रम सर्व विद्यार्थी ,अध्यापक, ग्राम प्रबोधनीतील सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत छान झाला.