फुले समिती वर निवड म्हणून सत्यशोधक ढोक यांचा सन्मान !!!

0
207

महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले चरित्र साधने व प्रकाशन समिती, ,मुंबई वरती निवड झाल्याबद्दल व सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी आजपर्यंत गेल्या ४ वर्षात देशभरात एकूण ४८ सत्यशोधक पद्धतीने मोफत विवाह लावून दिल्याबद्दल त्यांचा कर्णे हॉस्पिटल हॉल ,दहिवडी येथे दि.८ एप्रिल 2024 रोजी रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष सातारा जिल्हा महावितरण अधिकारी मा.हनुमंत ढोक , डॉ.श्रेयस आणि डॉ.वसुंधरा कर्णे ,लेखक प्रा.हरिश गोरे ,जेष्ठ समाजसेवक अरुण भुजबळ, विजय शिंदे ,दीपक ढोक,अशोक शेंडे,संतोष ढोक यांचे हस्ते शाल ,पुष्पगुच्छ,नारळ आणि सन्मान टोपी घालून सत्कार केला.

या वेळी डॉ.वसुंधरा कर्णे म्हणाले की ढोक यांनी आपले भागात दोन सत्यशोधक विवाह लावले त्यावेळी आम्ही हजर होतो ,त्यांनी ते कार्य यथोचित पार पाडले तसेच त्यांचे सोबत इतरही दोन तीन कार्यक्रम मध्ये आम्ही एकत्र असल्याने त्यांचे समाजातील कृतिशील कार्य पाहिले आणि पूर्वीपासून ऐकलेले आहे.त्यामूळे त्यांची शासनाने केलीली निवड ही माणवासियांच्या दृष्टीने अभिमान आहे .

अभियंता हनुमंत ढोक म्हणाले की आमचे बंधू असुनही आमची ओळख ३५ वर्षानंतर झाली त्यानंतर देखील आम्ही गावचे कार्यक्रमात बोलविले की लगेच हजर होतात .त्यांनी पुणे सातारा नव्हे तर महाराष्ट्राचे बाहेर जावून अनेक राज्यात जावून अनेक कार्यक्रम केले त्यामुळे त्यांचे नाव सर्वत्र परिचयाचे झाले असून त्यांनी अनेक ठिकाणी जावून मोफत सत्यशोधक विवाह लावत अनेक भाषेत महापुरशांचे पुस्तके लिहिली प्रकाशित केली आहेत त्यांच्या सामाजिक कार्याने आमच्या गावात एक हिरा आहे हे उशीरा समजले असे माण परिसरात

अनेक हिरे आहेत त्यांचे आपण सर्वांनी कौतुक समारंभ आयोजन करून इतरांना माहिती करून देणे आपले कर्त्यव्य आहे असे देखील म्हणाले.

सत्कारास उत्तर देताना ढोक म्हणाले की माझा माणवासियांनी सत्कार करून पुढे अजूनही खूप मोठे कार्य करावे अशा शुभेच्या दिल्याने मनाला तर आनंद तर झालाच सोबत मोठी जबाबदारी देखील वाढली आहे.

पुढे ढोक म्हणाले की फुले दाम्पत्यांनी अनेक सामाजिक कार्य करीत अनेक कार्य घरातून देखील केले त्यातील एक धागा पकडून मी सत्यशोधक विवाह व इतर कार्य केल्याने गेल्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना दिनास १५० वर्ष पूर्ण होताना नामदार भुजबळ साहेब यांनी देशाचे राष्ट्रीय नेते मा.शरद पवार यांचे हस्ते मुंबईत सत्कार केला ही देखील माझे कार्याची पावती आहे.गावावरून पुणे येथे जावून राज्यपाल श्रीनिवास पाटील व कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर यांचे शुभहस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे मराठी हिंदी इंग्रजी व जर्मन भाषेत पुस्तके प्रकाशित करून अनेक मान्यवर मंडळींचा सहवास लाभला. तसेच अनेक सामाजिक कार्य माझे शासनापर्यंत पोहचले, यासाठी कोणाचीही शिफारस नाही एवढी मोठी ताकत फुले दाप्त्यांचे कार्यात आहे प्रतिपादन करीत सर्वांनीच फुले दाम्पत्यांचे व इतर महापुर्षांचे जीवन संघर्ष, कार्य, विचार कृतीशील आचरणात आणावे असे आवाहन केले. तसेच समितीच्या माध्यमातून अल्पदरात साहित्य उपलब्ध करून विविध कार्यावर छोटेखानी विषयाप्रमाणे पुस्तके प्रकाशित करण्याचा मानस आहे असे देखील म्हंटले.

कार्यक्रमाचे आयोजन दहिवडी एस.टी.आगर प्रमुख संतोष बोराटे तर लेखक हरीश गोरे यांनी पाहुण्यांचा परिचय तसेच सूत्रसंचालन प्रा.छगनराव जठार यांनी केले आणि शेवटी आभार प्रा.प्रकाश ढोक यांनी मानले.यावेळी दहिवडी मधील अनेक संस्थेचे पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थीत होते.