फुगेवाडी मध्ये दोन टेम्पोचा अपघात; एक जण जखमी

0
6

दापोडी, दि. 14 (पीसीबी)

फुगेवाडी चौकात एका टेम्पोने दुसऱ्या टेम्पोला जोरात धडक दिली. यामध्ये एक जण जखमी झाला. हा अपघात सोमवारी (दि. 13) पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडला.

संजय रामभाऊ सिदुरकर (वय 50, रा. नाशिक) यांनी याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महादेव किसन जोगदंड (वय 27, रा. नवलाख उंबरे मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय हे त्यांचा टेम्पो घेऊन पुणे मुंबई महामार्गावरून दापोडीकडे वळण घेत होते. त्यावेळी पुण्याच्या दिशेने आलेल्या भरधाव टेम्पोने संजय यांच्या टेम्पोला जोरात धडक दिली. या अपघातात संजय यांच्या छातीला आणि पायाला मुका मार लागला आहे. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.