फुकट दूध दिले नाही म्हणून मसाला दूध ठेल्याची तोडफोड करत खंडणीची मागणी

0
771

दिघी, दि. २१ (पीसीबी) – फुकट मसाला दूध दिले नाही म्हणून एका तरुणाने कोयत्याने सामानाची व ठेल्याची तोडफोड करत व्यवसायिकाकडे पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. हा सारा प्रकार 15 जुलै रोजीआळंदी देवाची येथील देहूफाटा येथे घडला.

याप्रकरणी गुरुवारी (दि. 20) पृथ्वीराज शिवाजी पारधे (वय 27 भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिकेत मेटकर उर्फ गुड्ड्या (वय 20 रा दिघी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची देहू फाटा येथे संतकृपा मसाला दूध कॉर्नर ची गाडी आहे. आरोपी तिथे आला त्याने फिर्यादीला फुकट मसाला दूध व क्रीम रोल मागितला, यावेळी फिर्यादीने तो देण्यास नकार दिला. याचा राग येऊन आरोपीने लोखंडी कोयत्याने ठेवल्यावर जोरजोरात मारत फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच काउंटर वरील विक्रीच्या सामानाचे तोडफोड करून ग्राहकांना घाबरवले. कोयत्याचा धाक दाखवून दर महिना 5000 रुपये खंडणी दे नाहीतर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.