फुकटातले रेशन पडले महागात, महिलेची 20 हजारांची फसवणूक

0
368

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – फुकट रेशन मिळत असल्याचे सांगून महिलेला तिच्याकडील दागिने पिशवीत ठेवायला लावले. दरम्यान हातचलाखीने पिशवी बदलून 20 हजारांचे दागिने लंपास करत महिलेची फसवणूक केली. ही घटना गुरुवारी (दि. 14) दुपारी आळंदी-भोसरी रोड, भोसरी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला फुकट रेशन मिळत असल्याचे सांगितले. फुकट रेशन घेण्यासाठी दागिने काढून एका पिशवीत ठेवायला लावले. महिलेने 20 हजारांचे दागिने काढून पिशवीत ठेवले असता आरोपींनी हातचलाखीने पिशवी बदलून फसवणूक केली. 20 हजारांचे दागिने घेऊन आरोपी पळून गेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.