फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीकडून महिलेला शिवीगाळ

0
167

भोसरी, दि. 20 (प्रतिनिधी)

फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीने फोन करून महिलेला अश्लील शिवीगाळ केली. ही घटना मंगळवारी (दि. 18) दुपारी दापोडी येथे घडली.

याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8425020501 आणि 8828932364 या क्रमांकावरून बोलणाऱ्या बजाज फायनान्स कंपनीच्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या घरी असताना बजाज फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीने त्यांना फोन केला. फोनवरील व्यक्तीने महिलेला अश्लील शिवीगाळ करून त्यांचा विनयभंग केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.