फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्‍हा

0
61

पिंपरी,दि 0 ९ (पीसीबी)

सदनिकेवर कर्ज असतानाही ही बाब लपवून ठेवली. तसेच पैसे घेऊन सदनिकेची तिसर्‍याच व्‍यक्‍तीला विक्री करीत फसवणूक केली. याप्रकरणी एका महिलेसह दोन जणांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना पिंपरी कॅम्‍प परिसरात घडली.

याबाबत ५४ वर्षीय व्‍यक्‍तीने रविवारी (दि. ८) पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. राहुल अशोक मोत्यानी (वय ३६, रा. शनी मंदीरासमोर, पिंपरी) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. तसेच एका ६५ वर्षीय महिलेच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना २९ मार्च २०२२ ते १० ऑक्‍टोबर २०२२ या कालावधीत पिंपरी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करुन फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन केला. आरोपींनी विक्रीस काढलेल्‍या सदनिकेवर ४६ लाखांचे कर्ज असतानाही त्‍यांनी ही बाब लपवून ठेवली. तसेच या मिळकतीबाबत इतरांशी केलेल्‍या व्‍यवहाराची माहितीही लपवून ठेवली. फिर्यादी यांनी दिलेल्‍या १० लाख ७५ हजार रकमेचा परस्‍पर अपहार करीत फसवणूक केली. फिर्यादी यांनी दिलेली रक्‍कम परत मागितली असता फिर्यादी आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांना जीवे मारण्‍याची धमकी दिली. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.