फसवणूक प्रकरणी दहा जणांवर गुन्‍हा दाखल

0
133

पिंपरी, दि. १३ ऑगस्ट (पीसीबी) रावेत,

एका प्रौढाची फसवणूक केल्‍या प्रकरणी दहा जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना रावेत येथे घडली.

याबाबत एका ४४ वर्षीय नागरिकाने सोमवारी (दि. १२) रावेत पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दहा बॅक खातेधारक यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना २५ मे ते २३ जुलै २०२४ या कालावधीत रावेत येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास १० ते ३० टक्के परतावा देण्याचे अमिष आरोपींनी फिर्यादी यांना दाखविले. आस्था इनवेस्टर माध्यमातून फिर्यादीला वेगवेगळ्या बैंक अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगुन फिर्यादीची एकुण २२ लाख चार हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.