फसवणूक प्रकरणी चौघांवर गुन्हा; तिघांना अटक

0
462
187143521

दिघी, दि. ६ (पीसीबी) – दिलेल्या कर्जाचे 44 लाख 58 हजार रुपयाये देणे लागत असताना कर्जदाराकडून जबरदस्तीने पाच कोटी चक्रीवाढ दराने मागणी केली. गृह प्रकल्पाजवळ खड्डा खोदून ठेवला. बांधकाम साईटवरील साहित्य चोरून नेले. तसेच भागीदाराला चंदननगर पुणे येथे नेऊन वचनचिट्ठी करारनामा नोटरी करून घेतला. याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार 10 फेब्रुवारी 2021 ते 5 जून 2022 या कालावधीत चोविसावाडी च-होली बुद्रुक येथे घडला.

काळुराम ज्ञानेश्वर तापकीर, हिरामण महादू तापकीर, राजश्री काळुराम तापकीर, अनिल ज्ञानेश्वर तापकीर (रा. च-होली बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नितीन शंकर धिमधिमे (वय 41, रा. चिंचवड) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपींना 44 लाख 58 हजार 500 रुपये देणे लागत असताना फिर्यादीकडून जबरदस्तीने पाच कोटी रुपये चक्रीवाढ व्याजदराने मागणी केली. आरोपी काळुराम, हिरामण आणि राजश्री यांनी फिर्यादी यांच्या फॉर्च्युन वेदांसी चोविसावाडी या नियोजित गृहप्रकल्पाच्या ठिकाणी जेसीबीने खड्डा खोदून फिर्यादीचा येण्या-जाण्याचा मार्ग अडवला. सॅम्पल फ्लॅटला कुलूप लावून बंद करून तोडफोड करून नुकसान केले. फिर्यादी जर तिथे गेले तर हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी शिवीगाळ केली. बांधकाम साईटवरील साहित्य काळुराम यांनी चोरून नेले. काळुराम आणि राजश्री यांनी फिर्यादी आणि त्यांचे भागीदार पांडे यांना चंदननगर येथे जबरदस्तीने कारमधून नेऊन वचनचिठ्ठी (बंधपत्र) करारनामा नोटरी करून घेऊन चेकही जबरदस्तीने घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.