चाकण, दि. 12 (पीसीबी) : खरेदी केलेल्या वाहनाचे हप्ते न भरता तसेच वाहन मालकाला ठरलेल्या रकमेतील उर्वरित रक्कम न देता फसवणूक केली. ही घटना २१ ऑगस्ट ते ११ डिसेंबर या कालावधीत चाकण येथे घडली. याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र दामोदर राठोड (रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड याने फिर्यादी यांच्या नावावर असलेली गाडी (एमएच १२/डब्ल्यूएम २७२०) ३६ हजार रुपयांना खरेदी केली. त्यातील २४ हजार रुपये फिर्यादी यांना दिले. उर्वरित रक्कम न देता तसेच गाडीचे उर्वरित हप्ते न भरता फिर्यादी यांची फसवणूक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.