फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

0
358

चाकण, दि. ४ (पीसीबी) – बांधकामाच्या खरेदी विक्रीचे कोणतेही अधिकार नसताना गाळा विकला. त्यानंतर गाळा न देता फसवणूक केली. ही घटना 7 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर या कालावधीत आंबेठाण चौक, चाकण येथे घडली.

सचिन मोहन शेवकरी (वय 45, रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन याने किरण सूर्यकांत शेवकरी यांचे सहा मजली इमारत बांधकामासाठी घेतली होती. त्या बांधकामामध्ये सचिन याला खरेदी विक्रीचे कोणतेही अधिकार नव्हते. त्याला बांधकामासाठी 200 चौरस फूट इमारत बांधण्यासाठी अपुरी पडत असल्याने त्याने फिर्यादी सोबत करारनामा करून जागेच्या बदल्यात इमारती मध्ये एक गाळा देण्याचे आमिष दाखवले. इमारतीमध्ये फिर्यादीस गाळा न देता फसवणूक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.