फसवणूक प्रकरणी एकावर गुन्‍हा

0
5

महाळुंगे, दि.26 (पीसीबी)
मशिन खरेदी करून देतो, असे सांगून एका व्‍यक्‍तीची दोन लाख ५४ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. ही घटना ११ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२४ या कालावधीत महाळुंगे इंगळे येथे घडली.

सुभाष भाऊसाहेब वाकळे (वय ४१, रा. आंबेठाण रोड, चाकण, ता. खेड जि. पुणे) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मेहफुज खान (मोबाइल क्रमांक ८८५७०३५४४०, पूर्ण नाव, पत्‍ता माहिती नाही) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

फिर्यादी हे काम करीत असलेल्‍या महाळुंगे इंगळे येथील डी डी एम इंजिनियरिंग कंपनीला लागणार्‍या मशिन आरोपी मेहफुज याच्‍याकडून खरेदी करण्यासाठी ऑनलाईन व रोख स्वरुपात दोन लाख ५४ हजार ५०० रुपये घेतले. या पैशाचा वापर स्वतःच्‍या फायदयाकरीता करीत फिर्यादी यांची फसवणूक केली. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.