फसवणूक प्रकरणी एकावर गुन्‍हा

0
38

पिंपरी, दि. 27 (पीसीबी) : मालाची परस्‍पर विक्री करून तसेच विकलेल्‍या मालाचे पैसे स्‍वतःच्‍या खात्‍यावर घेत १५ लाख ७७ हजार ७५५ रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. याप्रकरणी एकावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना १० मे २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत तळवडे रोड येथे घडली.

सचिनकुमार मोहनलाल अगरवाल (वय ४५, तळवडे रोड पुणे) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चेतन तुकाराम देवरे (रा. ४०५, विधवहार हाईट्स, सव्‍र्हे नंबर ८२/३, दांगट पाटीलनगर, शिवणे पुणे, मुळ रा. वाडीभोकर रोड, वालवाडी, जयहिंद कॉलनी, ता. जि.धुळे) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी यांचे तळवडे रोड येथील सिमेंट डिलरशिपचे ऑफीसमध्ये नोकरीस आहेत. आरोपी चेतन याने माउली स्टोन डेपोचे मालक रमेश मारणे यांना देण्याकरीता फिर्यादी यांच्या दुकानातुन १४ लाख ९९ हजार ७५५ रुपयांचे सिमेंट घेऊन त्‍यापैकी ७ लाख ५० हजारांचा त्‍यांना माल दिला. त्‍यापोटी त्‍यांच्‍याकडून ७ लाख ५० हजार रुपये चेक व रोख स्वरुपात स्वतःचे नावावर घेतले. ते पैसे फिर्यादी यांना दिले नाहीत. तसेच उर्वरीत ७ लाख ४९ हजार ७५५ रुपयांचा माल परस्‍पनर इतर कोणाला तरी विकुन त्‍या मालाचे पैसेही फिर्यादी यांच्‍या कंपनीला दिले नाहीत. याशिवाय सान्‍वी ट्रेडर्स या नावाने स्वतःची फर्म काढून या फर्मचे नावे ७८ हजार रुपयांचा सिमेंटचा माल घेऊन त्याचेही पैसे अदयापपर्यंत फिर्यादी यांना परत दिलेले नाहीत. आरोपी चेतन देवरे याने फिर्यादी यांच्‍या कंपनीची १५ लाख ७७ हजार ७५५/- रुपयांची फसवणुक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.