“फर्स्ट जून चाईल्ड” पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन

0
6

दि.०४(पीसीबी)-९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथे ग्रंथाली प्रकाशित डॉ. यशवंत इंगळे लिखित “फर्स्ट जून चाईल्ड” या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन संजय कृष्णाजी पाटील (जोगवा चित्रपटाचे पटकथा लेखक) यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रंथालीचे विश्वस्थ सुदेश हिंगलासपुरकर, धनश्री धारप, दत्ता बाळसराफ प्रसिद्ध लेखक अभिराम भडकमकर, जेष्ठ लेखक पत्रकार सुधीर साबळे यांचे उपस्थितीत झाले.

डॉ. इंगळे यांच्या स्वानुभवातून शब्दबद्ध झालेले हे पुस्तक भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली. आजवर या इंग्रजी, हिंदी आणि कानडी भाषेत या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे.