फरशीवरची लघवी जिभेने चाटायला लावली, रॉडने मारहाण

0
419

– आठ वर्षे बंदिवानातील महिलेची व्यथा, भाजपा नेत्या सीमा पात्रा यांच्याकडून अनन्वित छळ

रांची, दि. ३१ (पीसीबी) – आदिवासी दिव्यांग महिलेसोबत केलेला छळ नुसता ऐकला तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. एक-दोन नव्हे तर आठ वर्षे हा छळ करण्यात आला. एका निवृत्त IAS अधिकाऱ्याची पत्नी आणि भाजपा नेत्या सीमा पात्रा यांनी हा अनन्वित छळ केला आहे. या पीडित मुलीचे नाव आहे सीमा. तीने सांगितलेला छळ ऐकतासुद्धा येणार नाही इतका भयावह आहे. तिला पोटभर जेवण तर नशिबात नव्हतेच. तिला रॉडने मारहाण करण्यात येत असे. इतकंच नाही तर तिला गरम तव्याने चटकेही दिले जात. तिची सुटका केल्यानंतर तिला रांचीच्या रिम्समध्ये भरती करण्यात आले आहे.

या पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की तिची मालकीण इतकी क्रूर होती की तिने रॉडने मारहाण करुन पीडितेचे दात तोडले. तिला केलेल्या मारहाणीने तिला चालता येणे अशक्य झाले होते. तिला जमिनीवर सरपटून चालावे लागे. अशा स्थितीत जर कधी चुकून तिची लघवी तिच्या खोली बाहेर गेली, तर मालकीम ती जमीन तिला जिभेने साफ करायला लावी. सुनीताने सांगितले की तिने गेले अनेक वर्ष सूर्यदर्शनच घएतले नव्हते. हे वृत्त समोर आल्यानंतर आता सीमा यांना भाजपातून काढून टाकण्यात आले आहे.

राज्यपालांनी व्यक्त केली नाराजी
राज्यपाल रमेश बैस यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील पोलि्सांच्या बघ्याच्या भूमिकेवरही त्यांनी ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई का केली नाही, असा सवाल त्यांनी पोलीस महासंचालकांना विचारला आहे.
हे नराधम पात्रा दाम्पत्य रांचीच्या व्हीआयपी मानल्या जाणाऱ्या अशोक नगर परिसरात राहतात. सीमा पात्रा यांचा दोन मुले आहेत. ही पीडित महिला गुमलाची राहणारी होती. मुलीचा दिल्लीत नोकरी मिळाल्यानंतर 10 वर्षांपूर्वी ती दिल्लीत गेली. 6 वर्षांपूर्वी ती रांचीत परतली. तेव्हापासून तिचा अनन्वित छळ करण्यात येतो आहे. तीला काम सोडायचे होते, पण 8 वर्षे तिला घरात बंदीवासात ठेवण्यात आले. घरी जाण्याचे तिने नाव काढले की तिला जबर मारहाण करण्यात येत असे. आजारी असताना तिच्यावर कधी उपचारही करण्यात आले नाहीत.

पीडित सुनिताने एके दिवशी एका मोबाईलवरुन सरकारी कर्मचारी ववेक बास्के यांना मेसेज पाठवला आणि तिच्यावर होत असलेल्या अत्याचारांची माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणात अरगोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यांनतर रांची पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या टीमने तिची सुटका केली. आरोपी सीमा यांचे पती महेश्वर पात्रा हे राज्याच्या आपतकालीन विभागात सचिव पदावर होते. विकास आयुक्त या पदावरुन ते निवृत्त झाले. त्यांची पत्नी सीमा भाजपा नेता होती. त्यांना पक्षाने बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानात प्रदेश संयोजिकेची जबाबदारी दिली होती.