फडणवीस हा कपटनितीमध्ये एक नंबर माणूस – सुषमा अंधारे

0
297

सोलापूर, दि. २८ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधताना सुषमा अंधारे यांनी अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. सत्तांतर होताना महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली आणि कपडे फाडणारी खाती शिंदे गटाकडे दिली. शिंदेंना बदनाम करण्याचे हे फडणवीस यांचे षडयंत्र आहे. फडणवीस हा कपटनितीमध्ये एक नंबर माणूस आहे, अशा शेलक्या शब्दांत अंधारे यांनी समाचार घेतला.

राज्याच्या मुख्यमंत्री पदावरुन उद्धव ठाकरे यांना पाय उतावर व्हाव लागलं. राजकीय वर्तुळात आजही हा चर्चेचा विषय ठरत असतो. दरम्यान, शिवसेनेच्या फायर ब्रॅंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री पद यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. सोलापूरमधील महाप्रबोधन यात्रेत अंधारे बोलत होत्या. यावेळी त्यांनी ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद कसं केलं याबद्दल भाष्य केलं.
अजित पवार, अशोक चव्हाण, पृथ्विराज चव्हाण यांसारखी मुख्यमंत्रीपद भुषवलेली माणसं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नाहीत. यालोकांनी कधी एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम केलं नसंत. म्हणून कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या असं सांगितलं होत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात पडली. असा खुलासा अंधारे यांनी केला.

त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला. महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली आणि कपडे फाडणारी खाती शिंदे गटाकडे दिली. शिंदेंना बदनाम करण्याचे हे फडणवीस यांचे षडयंत्र आहे. फडणवीस हा कपटनितीमध्ये एक नंबर माणूस आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.