फडणवीस, शिंदेंना पाठिंब्यावर मनसेचा मोठा निर्णय

0
280

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात येण्याची स्पष्ट चिन्हं दिसू लागली आहेत. भाजपाने आता या राजकीय गोंधळात थेट एन्ट्री घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करावी या मागणीसाठी आम्ही राज्यपालांकडे गेलो असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी सरकारच्या बहुमत चाचणीचं पत्रही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलं आहे. त्यामुळे आता राज्यपालांच्या भूमिकेवर ठाकरे सरकारचं भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या मनसे ने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

राज ठाकरे यांनी भाजपला सपोर्ट केला आहे. मनसे आता उद्याच्या बहुमत चाचणीत भाजपाच्या बाजूने मतदान करणार आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे भाजपाच्या बाजूने मतदान करतील.

राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. आकड्यांचं समीकरण जुळवून आणल्याने फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झालाय. यामुळे भाजप नेत्यांनी फडणवीसांच्या अभिनंदनाचे ट्वीट करण्यास सुरुवात केली आहे. आमदार अतुल भातखळकर यांनीही ट्वीट करत ‘पुन्हा फडणवीस येणारच…’ असं म्हटलंय.