फडणवीस-पवार-शिंदे मराठ्यांना उतकावतात – जरांगे पाटील यांचा आरोप

0
286

पिंपरी दि.१४ (पीसीबी) :- “छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते बोलत आहेत. कारण यांना दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या तिघांनी मराठ्यांना उचकवायला सांगितलं आहे”, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथील सभेतून केला. सभेला अभूतपूर्व अशी गर्दी असून दहा दिवसांत निर्णय झाला नाहीच तर कठोर निर्णय घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

सरकारला वाटतं मराठे रागीट आहेत काहीतरी करतील आणि त्यानंतर आपण मराठ्यांना आरक्षण देणार नाही. पण मराठ्यांनो तुम्ही उचकू नका, उद्रेक करु नका हे काय आरक्षण देणार नाहीत, यांच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

फक्त कोणी मध्ये बोलत आहे म्हणून उचकू नका, तुमचा मुलगा म्हणून मी लढत आहे. जो आपल्याला विरोध त्यांना सराकर पुढे करत आहे. एकाने आरक्षण घालवलं पण दुसऱ्याला आपली जबान एकजूट झाली आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा शांततेत येऊन विजय मिळवतो, असा संदेश आज मराठ्यांनी राज्याला देशाला आणि जगाला दिला आहे. आपण उचकू म्हणून सरकारने आज माझं फेसबूक अकाऊंट बंद केलं. पण मला त्यांना सांगायचं आहे. नेट-फेट बंद करुन मराठ्यांचं काही होत नाही. मराठे तुमच्या पुढचे आहेत.

माझ्या मराठ्यांनी तुम्हाला गादीवर बसवले. तुमचं उलथं पालथं करायला आम्हाला वेळ लागणार नाही. आमच्या लेकरांना तुम्ही विष पाजत असाल तर मराठे तुम्हाला कोणत्या कोपऱ्यात ढकलतील हे तुम्हाला देखील कळणार देखील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. (Latest Marathi News)

जिथं सरकारचं डोकं बंद पडते तिथं मराठ्यांचे डोकं सुरु होते. आमच्या जातीवर तुम्ही अन्याय केला. या अन्यायाच्या विरोधात शांततेत लढून मराठ्यांना आरक्षण देणार, त्याशिवाय मागे हटणार नाही. राज्य आणि केंद्र सरकारने आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.