फडणवीस आणि मी मिळून विधानसभा निवडणुकीत 200 जागा निवडून आणू

0
261

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जोरदार बॅटिंग करत आपण आणि फडणवीस मिळून आगामी विधानसभा निवडणुकीत 200 जागा निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला. तसे जर झाले नाही मी शेती करायला निघून जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. माझ्यासोबत असलेल्या 50 पैकी एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार, असा शब्दही त्यांनी दिला. देवेंद्र फडणवीस आणि आमचा अजेंडा सेम आहे. आमचे 50 आणि त्यांचे 115 असे एकूण 165 आमदार झाले आहोत. पुढील निवडणुकीत ते 200 करू.

शिवसेना सोडलेल्या नेत्यांना पुढे राजकीय भवितव्य नसल्याचे उदाहरण अजितदादांनी आपल्या भाषणात दिले होते. त्याला शिंदे यांनी उत्तर दिले. ज्यांनी शिवसेना सोडली ते सेनाविरोधातील पक्षात गेले होते. आम्ही हिंदुत्व तिकडे गेलो आहोत. त्यामुळे तशी अडचण येणार नाही. चिन्ह काय मिळणार, कधी मिळणार याची काळजी नाही. आपण शिवसेनेवाले आहोत. जिथे लाथ मारू तिथून पाणी काढू, पण माझ्यासोबत असलेल्या एकाही आमदाराला कमी पडू देणार नाही
महाविकास आघाडी सरकारच्या काळातच मला मुख्यमंत्री करायचं ठरलं होतं, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

तसेच 2014 मध्ये भाजप-शिवसेना युती असतानाच मुला उपमुख्यमंत्रीपद देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच मला सांगितले होते. पण ते मला मिळणार नाही, याची खात्री होती. कारण हे पद मला आमच्या पक्षाला द्यायचे नव्हते, असाही प्रसंग शिंदे यांना आज विधानसभेत विशद केला. महाविकास आघाडी सरकार असल्याने मला मुख्यमंत्रीपद देता येत नाही, असे आमच्या नेतृत्वाने सांगितले होते. त्यानंतर स्वतः ठाकरे मुख्यमंत्री झाले. मी नाराज झालो नाही. कारण पदासाठी मी कधीच काम केले नाही.