पिंपरी , दि. २६ (पीसीबी)- यंदा पिंपरी चिंचवड शहरामधे वर्दळीच्या परिसरात फटाके दुकानांना परवानगी देऊ नये अशा मागणीचे पत्र पिंपरी चिंचवड आयुक्त यांना देण्यात आले तसेच पोलीस आयुक्त साहेब, अग्निशमन विभाग व सर्व क्षेत्रिय प्रभाग अधिकारी, यांना भेटुन चर्चा करुन मागणीचे पत्र देण्यात आले करण्यात आले .पत्रात नमूद करणेत आले की गजबजलेल्या बाजारपेठे मधे फटाके विक्री दुकाने असतील तर आग लागणे व त्या आगीचे रौद रूप घेणेचे, जीवित व वित्त हानी होणेचे,दुर्घटनेचे प्रकार होऊ शकतात. हे सत्य आपण नाकारु शकत नाही. दुर्घटना घडु नये यासाठी उपाययोजना म्हणुन आपण पिंपरी बाजारपेठ,रिव्हर रोड, शगुन चौक,आर्यसमाज चौक, कराची चौक, साई चौक, डिलक्स चौक, पिंपरीगाव, चिंचवड लिंकरोड, पाचपीर चौक काळेवाडी, तापकीर चौक, रहाटणी फाटा, कोकणे चौक, शिवार चौक व इतर परिसरात फटाके विक्री दुकाने थाटणेस बंदी घालावी. यामुळे वर्दळी च्या परिसरात कुठलेही अघटीत घडणार नाही व दिवाळी सणाला गालबोट लागणार नाही. याला पर्याय आपण प्रत्येक प्रभागातील मोकळ्या जागेत फटाके दुकाने विक्रेत्यांना उपलब्ध करुन द्यावीत व आग्निशमन व इतर सेवा सुविधा द्याव्यात. जर काही दुर्घटना झालेस तात्काळ आग आटोक्यात आणता येईल व लोकवस्ती पासुन दुर असलेने कुठलेही नुकसान होणार नाही.