फटाके वाजविण्याच्या कारणावरून मारहाण

0
73

वाकड, दि. 06 (पीसीबी) : फटाके फोडण्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोक्याने तरुणांना मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. २) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास वाकड मधील छत्रपती चौकात घडली.

अमित शत्रुघ्न चंदनशिवे (वय २०, रा. अशुलकासा सोसायटी, छत्रपती चौक, कस्पटे वस्ती, वाकड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि. ५) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजेश चौधरी (वय २६) व त्‍याचे चार साथीदार (नाव, पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी अमित चंदनशिवे व त्याचे मित्र रोहन पवार, राजरतन कांबळे यांच्‍यासोबत माणिक गेणू कस्पटे मनपा शाळेच्या बाजूला, छत्रपती चौक, वाकड येथे फटाके फोडत होते. त्यावेळेस आरोपींनी त्यांना फटाके वाजवू नका, असे विनाकारण ओरडले. यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपीने मनात राग धरून शिवीगाळ, दमदाटी करत फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना प्लास्टिक बांबूने डोक्यात मारहाण करून जखमी केले. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.