फक्त छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घ्यायचं आणि राजकारणं करायचं – संभाजीराजेंचा महायुती, महाविकास आघाडीला इशारा

0
59

छत्रपती संभाजीनगर, दि. २६ (पीसीबी) : महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे महाराष्ट्रात दोन बड्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये मोठी फूट पडली. या दोन्ही पक्षांचा एक गट सत्तेत आहे, तर दुसरा गट हा विरोधात आहे. यानंतर राज्यात विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. दोन पक्षांचे चार पक्षांमध्ये रुपांतर झाल्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ आहे. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काही छोटे पक्ष आणि संघटना तिसरी आघाडीसाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष आणि आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष नवी राजकीय क्रांती घडवण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये बैठकही पार पडली आहे. यानंतर संभाजीराजे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मिश्किलपणे भाष्य केलं.

“आमदार बच्चू कडू आणि माझी मुंबईत बैठक झाली असता आपण नावीन्यपूर्ण महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करू, अशी चर्चा झाली. ही चर्चा सुरु असताना शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आलो. तेव्हा आपण वेगळा महाराष्ट्रासाठी घडवू शकतो असे समजले”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

“दोन काँग्रेस, दोन राष्ट्रवादी पक्ष यामुळे मी गोंधळून गेलो आहे. गाव दोन नावांचे असतात, तसे कोण आहेत? राष्ट्रवादी खुर्द, कोण आहेत ? राष्ट्रवादी बुद्रुक कोण आहे? शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक कोण? हे का जनतेच्या हितासाठी झाले का? तुम्ही आमच्या आयुष्याचा खेळ केला”, अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

“माझं चॅलेंज आहे की, तुम्ही किल्ल्यांसाठी किती पैसे दिले हे सांगा. ७५ वर्षात फक्त 1 कोटी खर्च. फक्त शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे. राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले होते. १२ डिसेंबर रोजी सांगितले की योग्य पद्धतीने काम झाले नाही. मात्र तेव्हा कुणी काही बोलले नाही. विरोधकही शांत झाले”, असं संभाजीराजे म्हणाले.

“शर्यतीतील शेवटचे घोडे पुढे आले तर त्याला डार्क हॉर्स असे नाव दिले. तसे आपण डार्क हॉर्स आहोत. आपण टुकटुकचा घोडा असून कसे मागून पुढे जाणार हे कळणारही नाही. आम्ही का फक्त आयुष्यभर चळवळ चळवळ करायची? बच्चू कडू यांच्याकडून शिकण्यासारखं आहे की, वेळप्रसंगी कुठली ती महायुती? आता थोकठोकी होणार. माझा जन्म घराण्यात झाला मात्र तुम्ही मोठे”, असं संभाजीराजे म्हणाले.