तळेगाव दाभाडे, दि. २२ (पीसीबी) – एक प्लॉट दोघांना दाखवून त्यांच्याकडून पैसे घेत प्लॉट कोणाच्याही नावावर करून न देता पैशांचा अपहार केला. हा प्रकार सन 2019 ते सन 2022 या कालावधीत सोमाटणे फाटा येथे घडला.
रहिमान सईद शेख, गौर सईद शेख आणि रहिमान याची पत्नी (रा. धानोरी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने गुरुवारी (दि. 22) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रहिमान याने त्याच्या पत्नीच्या नावे असलेला प्लॉट फिर्यादी आणि अली इब्राहीम सय्यद व पंकज अरुण दीक्षित यांना दाखवला. रहिमान याने त्याची पत्नी आजारी असून तिच्यावर शस्त्रक्रिया करायची असल्याने पैशांची गरज असल्याचे कारण सांगत फिर्यादीकडून 14 लाख 20 हजार रुपये आणि अली इब्राहीम सय्यद व पंकज अरुण दीक्षित यांच्याकडून 15 लाख रुपये घेतले. दोन्ही पार्ट्यांकडून 29 लाख 20 हजार रुपये घेत कोणाच्याही नावावर प्लॉट करून न देता त्या पैशांचा आरोपींनी अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.