प्लॉट घेण्यासाठी पैसे घेत तीन कोटींची फसवणूक

0
278

हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) – हिंजवडी परिसरात प्लॉट घेण्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले. मात्र नागरिकांनी बुक केलेला प्लॉट अथवा त्यांचे पैसे परत न करता तीन कोटी सहा लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना सन 2012 ते सन 2021 या कालावधीत साईरंग डेव्हलपर्स हिंजवडी आणि हिंजवडी परिसरात घडली.

तेजस सॅमसन गायकवाड (वय 36, रा. रा. किवळे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साईरंग डेव्हलपर्सचे मालक के आर मलिक, शाहरुख मलिक, एक महिला आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या सोबतच्या प्लॉट धारकांनी साईरंग डेव्हपर्सचे मालक आरोपी यांना सन 2012 ते सन 2021 या कालावधीत हिंजवडी आणि हिंजवडी परिसरात इतर ठिकाणी प्लॉट घेण्यासाठी पैसे दिले. आरोपींची पैसे घेऊन नागरिकांना त्यांनी बुक केलेला प्लॉट आगर बुक केलेल्या प्लॉटचे पैसे परत न देता तीन कोटी सहा लाख नऊ हजार 743 रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.