प्लांट वरील पार्किंगमध्ये पार्क गाड्यांच्या अवघ्या एका तासात 16 बॅटरी चोरीला

0
284

वडमुखवाडी, दि. ०३ (पीसीबी) – कंपनीच्या प्लांटव पार्क असलेल्या गाड्यांच्या 16 बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेच्या आहेत. ही चोरी मंगळवारी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान वडमुखवाडी येथील इंगवले पाटील कंस्ट्रक्शन कंपनीच्या प्लांट वर घडली आहे.

याप्रकरणी सागर नानासाहेब जंजिरे (वय 29 रा.चिखली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार, इंगवले पाटील कंस्ट्रक्शन कंपनी या नावाने आर.एम.सी. प्लांट व डांबर प्लांटच्या पार्किंगमध्ये 25 गाड्या पार्क होत्या. यातील 8 गाड्याच्या 88 हजार 16 बॅटरी चोरांनी चोरून नेल्या आहेत. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.