प्रेयसी सोबत राहता यावे म्हणून केले पत्नीवर चाकुने वार

0
391

आळंदी, दि. २७ (पीसीबी) – प्रेयसी सोबत एकत्र राहता यावे यासाठी पती व त्याच्या प्रेयसीने जिवे मारण्याच्या उद्देशाने मिळून पत्नीचे पाय दोरीने बांधून तिच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत.

हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.25) दुपारी चिंबळी येथे घडली असून पीडित महिलेने आंळदी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.26) फिर्याद दिली असून आरोपी पती व त्याच्या प्रियसीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पती ला व त्याच्या प्रेयसीला घरात एकत्र रहायचे होते. यासाठी आपण हिला मारून टाकल्याशिवाय आपल्या दोघाना एकत्र राहता येणार नाही म्हणत आरोपींनी फिर्यादीचे पाय दोरीने बांधले व आरोपी महिलेने फिर्यादीचे हात पकडून पतीने तिच्या गळ्यावर चाकुने वार केले.यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.